अक्षरनंदन मधील एक दिवस

अक्षरनंदन मध्ये डोकावलतं तर विविध कलाकृतींनी चित्रित झालेले फलक तुमचं स्वागत करतील. तुम्ही याल त्यादिवशी असे काहीसे दृश्य असेल.

 बोलक्या भिंती

मुलांचं लेखन, एखादी कविता ऐकून काढलेली चित्र, घडीकामाचे नमुने, तोरणं इथल्या भिंतीना चैतन्य आणतात. Animal बँक मॅनेजरला विचारलेल्या प्रश्नांची यादी, टेकडीवरून बघितलेल्या घरांची रेखाचित्रे, पावसात भिजल्याचं वर्णन, नुकतेच शिकलेले हेमचे टाके मिरविणारे रुमाल - भिंतीवर प्रत्येकाचं काही न् काहीतरी झळकत असतं.

 अंतर्मुख होताना

आपल्या सर्वांचं भरणपोषण करण्या-या पृथ्विविषयीची प्रार्थना झाल्यानंतर - आज प्रार्थना बंगालीत होती - सर्व मुलं शांत, डोळे मिटून बसली आहेत.

 पानांचे प्रदर्शन

 chimukaleजमविलेल्या पानांचे वर्गीकरण करण्यात दुसरीचा वर्ग मग्न आहे. निमुळती पानं, ठिपक्यांची पानं, संयुक्त पानं, खरखरीत पानं... वर्गीकरणासाठी खरोखरीच एकूण १८ निकष मुलांनी शोधले आहेत.

 चिमुकले संशोधक

आज गुरुवार  असल्यानं मुलं गणवेशात आहेत. मंडईतल्या सहलीनंतर शिशुगट आवडत्या भाज्यांच्या चित्रांवर चौकोन चिटकवून स्तंभलेख काढत आहेत. आज बटाटा आघाडीवर आहे. 

 निसर्गाच्या कुशीत

carनिसर्गचक्रात जंगल अबाधित राहण्याचं महत्व भूगोलात शिकल्यानंतर, सहावीची मुले जवळच्या चतुःश्रुंगीच्या वनराईत चिपकोचं नाटुकल करायला गेली आहेत. पायातल्या कमजोरीवर मात करून उदितही, मित्राच्या मदतीने टेकडी चढून गेला आहे.

 जोमानं वाढताना

पाचवीचा वर्ग शाळेच्या लहानशा शेतात आहे. काही जण मक्याच्या पेरणीच्या तयारीत आहेत तर काही छोट्या बादल्या घेऊन आसपासच्या घराघरातून गांडूळांसाठी ओला कचरा आणायला गेले आहेत.  Imageअण्वस्त्रावरची चर्चा  नववीच्या वर्गात रंगली आहे. स्त्री-पुरुष समानता, राखीव जागा अशा अनेक विषयांवर निबंध लिहिण्याआधी, मोठया मुलांमध्ये खरमरीत   गटचर्चा होतात.
 
गरमागरम पराठे

साधारणपणे महिन्यातून एकदा बनविल्या जाण्या-या खाद्यपदार्थातशाळेतल्या वाफ्यात उगवलेल्या मेथीचा नंबर लागलेला दिसतोय. मुलांनी गटागटात लाटून भाजलेल्या पराठ्यांचा खमंग वास चौथीच्या वर्गातून येतो आहे.

 भाषेची आडकाठी नाही

सातवीच्या वर्गात फ्रेंच पाहुण्यांबरोबर इंग्रजीतून गप्पा रंगल्या आहेत. दोघांसाठीही ते जरा कठीणच जातंय. पण कुतूहल व मैत्री यांची जीत झाली आहे.

 धडयातील प्रत्यक्षात

आवारातील पूर्वेकडे कोप-यात काठी रोवली आहे. दर आठवड्याला, ठराविक वेळी काठीची सावली कुठे पडतेय याची नोंद करून मुलं उत्तरायण-दक्षिणायन पडताळून पाहत आहेत.

 वास्तवातील समान संधी

शाळेजवळील माळरानात माती-वडारांनी पालं ठोकली आहेत. त्यांच्याशी बातचीत करून, त्यांचे जीवन बघून दहावीची मुलं नागरिकशास्त्रातील 'जगण्यासाठी समान संधी' हे तत्व व्यवहारात कधी व कसे उतरेल याविषयी बोलणे करत आहेत.

 श्रमातून सर्जन

पाबळच्या विज्ञान आश्रमाच्या भेटी नंतर आठवीचा वर्ग कार्यशाळेत मग्न आहे. काही जण फेरोसिमेंटची टाकी करत आहेत तर काही झाडाखाली बसण्यासाठी बाकं.