मदतीचा हात

अक्षरनंदनला कायम विना अनुदानित शाळा म्हणून शासकीय मान्यता मिळाली आहे.  प्रयोगशिलतेसाठीचा अवकाश जपण्यासाठी स्वायत्तता राखणे महत्वाचे आहे. अक्षरनंदनच्या उभारणीत आपला मदतीचा हात हवा आहे.

आपण असे सहाय्य करू शकता -

1. विविध सुविधांनी सुसज्ज अशा इमारतीसाठी वा त्यातील विविध दालनासाठी मदत. उदाहरणार्थ -

  •   पुस्तकांचे विश्व खुले करणारे समृद्ध ग्रंथालय
  •   जिज्ञासा व निरीक्षण ह्यांना चालना देणारी प्रयोगशाळा
  •   टाकाऊ  साहित्याचा वापर करून साहसाला वाव देणारे क्रीडा संकुल
  •   उपयोगी व कलात्मक वस्तूंच्या निर्मितीसाठी उद्योगशाळा.

2. दत्तक पालक योजनेत सहभाग

  • निम्न आर्थिक गटातील एका विद्यार्थ्याचे , एका वर्षाचे पालकत्व - 12,000 रुपये
  • एका विद्यार्थ्याच्या संपूर्ण शालेय शिक्षणाची [ १२ वर्षे ] जबाबदारी घेऊन एका तपाचे पालकत्व - एक लाख रुपये 

3. शिक्षकांनी स्वतः सतत शिकत राहून, आपली जाण प्रगल्भ करण्यासाठी संधी देण्या-या शिक्षक विकास निधीत सहभाग.

4. शाळेला उपयोगी वस्तू वा सेवा देऊन सहभाग.

आपला बहुमोल चेक 'एन जी नारळकर फाउंडेशन' या नावाने काढावा. आयकरच्या ८० जी या नियमानुसार देणग्यांना सवलत उपलब्ध आहे.